त्या आठ चेंडूनं बांगलादेशचा घात केला....
Haupt-Reiter

त्या आठ चेंडूनं बांगलादेशचा घात केला....
तो आला आठ चेंडूत षटकारांची आतिषबाजी केली आणि विजय मिळवून दिला...
कोलोंबो : अखेरच्या दोन षटकात विजयासाठी 34 धावांची गरज असताना दिनेश कार्तिकने ghjgghj hgकेवळ 8 चेंडूत नाबाद 29 धावांचा तडाखा देत भारताला बांगलादेशविरुद्ध चार गडी राखून थरारक विजय मिळवून दिला. यासह प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये टी20 तिरंगी मालिकेत सहभागी झालेल्या युवा भारतीय संघाने दिमाखदार जेतेपद उंचावले. दिनेश कार्तिकने खेळलेल्या आठ चेंडूने बांगलादेशचा घात केला असे म्हणायला हरकत नाही.
एकवेळ सुस्थितीत असणारा भारतीय संघ कर्णधार रोहित शर्मा बाद झाल्यानंतर दडपणात आला होता. हातातील सामाना बांगलादेशच्या गोलंदाजांनी हिसकावून घेतल्याचे चित्र तयार झाले होते. नवखा विजय शंकर खेळताना चाचपडत होता तर मनिष पांडेलाही आपली चमक दाखवता येत नव्हती.
अत्यंत थरारक झालेल्या या सामन्यात अखेरच्य
ा तीन
षटकात भारताला 35 धावांची गरज असताना युवा अष्टपैलू विजय शंकर दडपणाखाली ढेपाळला. यावेळी मुस्तफीझूर रहमानने टिच्चून मारा करत पहिले चार चेंडू निर्धाव टाकले, तर पाचव्या चेंडूवर विजयने लेगबायच्या जोरावर धाव घेतली. मात्र, अखेरच्या चेंडूवर स्थिरावलेला मनिष पांडे (28) बाद झाल्याने बांगलादेश मजबूत स्थितीत आला.
- Zum Verfassen von Kommentaren bitte Anmelden.
- 175 Aufrufe